वर्दीचा गैरवापर करणाऱ्या जातीयवादी एपीआय शिवाजी नागवे यास पोलीस खात्यातून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची धनगर समाज बांधवाची मागणी !

● अंबड पोलीस स्टेशन येथे समाजाच्या वतीने निवेदन !
अंबड/प्रतिनिधी:दि.3
काल (दि.2) वार शुक्रवारी वर्दीचा गैरवापर करून धनगर समाज बांधवांना मारहाण करणाऱ्या जातीयवादी एपीआय शिवाजी नागवे यास पोलीस खात्यातून कायमस्वरूपी बडतर्फ करणेबाबत अंबड पोलीस स्टेशन येथे धनगर समाज बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले..!
गोरगरीब,शेतकरी, वयस्कर धनगर समाज बांधवांवर वर्दीचा माज दाखवत असवैधानिक मार्गाने अटक करून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा जितका करावा तितका निषेध कमीच आहे. हा जातीवादी एपीआय नागवे यास बडतर्फ करावे व धनगर समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घेण्यात यावे नसता धनगर समाज पूर्ण ताकतीनिशी संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही..!
निवेदन सादर करतेवेळी, बाळासाहेब तायडे, बळीराम तात्या खटके, अनिल भालेकर, रामशेठ लांडे, सचिन खरात, दत्ता लोहकरे, बाबू लांडे, अशोक खरात,सैनाजी खरात, अनिल मिसाळ, रामेश्वर भोजने, सचिन लांडे, नामदेव कोल्हे, नंदू पुंड..
समाज बांधव उपस्थित होते..!