मिमिक्री आर्टिस्ट अभिनेते आशिष सातपुते यांनी गाठले अल्पावधीतच यशाचे शिखर!

◆ 300 पेक्षा जास्त कलाकारांचे हुबेहूब आवाज काढून केला विश्वविक्रम!
जालना/भगवान धनगे, दि.11
जालना- मिमिक्री आर्टिस्ट अभिनेते आशिष सातपुते हे मूळचे पिंपळनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील आहेत पण सध्या ते घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर मध्ये राहत आहेत. आशिष ला लहानपणापासून कलाकारांची राजकीय नेत्यांची नक्कल करायची आवड होती,सुरवातीच्या काळात त्यांनी अभिनेते दादा कोंडके आणि मकरंद अनासपुरे आवाज काढायचे त्यामुळे चाळीतील मुले त्यांना मक्या म्हणून चीडवू लागले पण त्यांनी त्याचे वाईट वाटून न घेता लोकांकडे दुर्लक्ष केले आणि आपले नकला करण्याचे काम सुरूच ठेवले आता पर्यंत ते जवळ जवळ 300 कलाकारांचे हुबेहूब आवाज काढत आहेत त्यात ते हिंदी मराठी चित्रपट कलाकारांचे आवाज तर ते राजकीय नेत्यांचे पण आवाज काढतात
अभिनेते दादा कोंडके,अशोक सराफ,नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे,सयाजी शिंदे, सदाशिव अमरापूरकर,या मराठी दिग्गज अभिनेते बरोबरच ते बॉलिवूड अभिनेत्यांचे पण आवाज काढतात त्यात प्रामुख्याने सुपर स्टार अमिताभ बच्चन,मिथुन चक्रवर्ती,परेश रावल,राजकुमार,अमरीश पुरी यांचे हुबेहूब आवाज काढतात त्याच बरोबर ते साई बाबांची भुमिका पण उत्तम करतात,इतकी की लोक त्यांच्या पाया पडतात तसेच ते जादुगार देखील आहेत,ते फाटलेल्या कागदांची टोपी करून घालतात , आतापर्यंत त्यांनी अभिनेते अशोक सराफ आणि नटराज सर यांना टोपी घातली आहे ,त्यांची मिमिक्री बघुन अभिनेते दिग्दर्शक नटराज सर यांनी त्यांची येणारी विनोदी वेब सिरीज ‘ फॉरेनर फ्रेंड ‘ या मध्ये विनोदी भुमिका दिली आहे!
