जालना जिल्हा युवासेना पदाधिकारी मुलाखतीला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद :इच्छूकांची तोबा गर्दी….मुलाखती परिसर घोषणांनी दणाणला पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा – रुपेश कदम

जालना/भगवान धनगे,दि.1
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व
महाराष्ट्रातील युवकांच्या मनात प्रचंड आस्था असणारे युवानेते
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राज्यातील
अनेक युवक युवासेनेकडे आकर्षित होताना दिसत आहेत. याच गोष्टीला अनुसरून
आज १ ऑक्टोबर रोजी जालना शहरातील मस्तगड येथील शिवसेना भवनात जालना
जिल्ह्यात युवकांसाठी पदाधिकारी मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी
जालना जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात मुलाखतींना उपस्थिती दर्शवून
शिवसेनेप्रती असलेली आपली निष्ठा दाखवून दिली आहे.
मुंबई येथून रुपेश कदम, विपुल पिंगळे,अक्षय ढोबळे,पेडणेकर, डॉ. नरसिंगे
यांनी मुलाखती घेतल्या. यामध्ये जिल्हा युवाधिकारी,उपजिल्हा युवाधिकारी,
तालुका युवा अधिकारी,तालुका युवा उपअधिकारी या पदासाठी मुलाखती घेण्यात
आल्या. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर,माजी
आमदार संतोष सांबरे,उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, बाला परदेशी,युवासेना
जिल्हा समन्वयक भरत सांबरे, अंकुश पाचफुले, विनायक चोथे,राजु
सलामपुरे,दुर्गेश काठोटिवाले,मंगेश गव्हाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी युवासैनिकांना मार्गदर्शन करतांना युवासेना कोअर कमिटी सदस्य
रुपशे कदम म्हणाले की, शिवसेना -युवासेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी
कामाला लागावे असे सांगून पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या राजकीय
वातावरण पाहता पक्षाचे संघटन मजबूत करण्याची गरज असून गट,तट,जुने वाद
उकरून न काढता एकसंघ काम करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाने उभे राहावे.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची शिकवण व शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे बळ वाढवण्यासाठी
सर्वांनी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.
जालना जिल्हा युवासेना पदाधिकारी नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीला
जिल्ह्यातील युवासैनिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान यावेळी
शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर गाड्यांच्या लांबलांब
रांगा लागल्या होत्या. प्रचंड घोषणाबाजी… तरुणाईचे उत्साह पाहून
मुलाखती परिसरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी यावेळी
युवासेनेचे जिल्हा समन्वयक भरत सांबरे, जिल्हा समन्वयक अंकुश पाचपुâले,
शिवाजी शेजूळ,गणेश काळे,विनायक चोथे, महेश नळगे,बळीराम मोरे,गणेश
डोळस,दिगंबर बोराडे,बाळासाहेब करतारे,भरत मदन आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी मस्तगड येथील शिवसेना भवन येथे युवासेनेचे कार्यकत्र्यांनी
जोरदार घोषणाबाजी केली. हा परिसर पूर्णपणे भगवामय झाला होता.
———————————————————————
५ ते ६- जालना येथील मस्तगडस्थित असलेल्या शिवसेना भवनात आज युवासेनेच्या
पदाधिकारी नियुक्तासाठी मुलाखती झाल्या. यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी मुंबई येथील युवासेनेचे कोअर कमिटीचे पदाधिकारी, शिवसेना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, युवासेनेचे भरत
सांबरे, अंकुश पाचफुले आदी.

——————————————————————-