Uncategorised

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम व आरोग्य शिबीर संपन्न

जालना/भगवान धनगे,दि.1

दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या सेवा पंधरवाडा विशेष मोहिमेअंतर्गत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम व आरोग्य शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्री. प्रताप घोडके हे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरीक मंचचे अध्यक्ष ज्ञानदेव पायगव्हाणे, प्रा. रावसाहेब ढवळे, लक्ष्मीकांत कंकाळ, पुरस्कार्थी बाबुराव सतकर, पुरस्कार्थी गोविंद पाखरे, अध्यक्ष उज्वल बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या श्रीमती करुणाताई मोरे, शाहीर आप्पासाहेब उगले आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. घोडके यांनी ज्येष्ठ नागरीकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले तर प्रा. श्रीमती रेणुका बडवणे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे व योजना वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रावसाहेब ढवळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अमित घवले यांनी केले. विशेष अधिकारी दत्तात्रय वाघ यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे, ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक व कार्यक्रमास उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरीकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य शिबीरामध्ये 75 ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास मोठया संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!