Uncategorised

“धुळे जिल्ह्यात राज्यस्तरीय ग्रॅपलिंग (कुस्ती) स्पर्धेसाठी संभाजीनगर, वैजापूर तालुक्यातील जितेंद्र ठेंग यांची लखनऊ येथील स्पर्धेसाठी निवड”

वैजापूर/भगवान धनगे,दि.30

ग्रॅपलिंग कमिटी ऑफ इंडिया संलग्नित ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र व ग्रॅपलिंग कमिटी ऑफ धुळे आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य ग्रॅपलिंग कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन धुळे जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल,देवपूर धुळे येथे दिनांक २६ व २७ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते,सदर स्पर्धेत कॅडेट ज्युनिअर व सिनिअर (मुले व मुली) या गटातील या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जवळजवळ २०० खेळाडूंचा सहभाग नोंदवला गेला यात मुलींची संख्याही उल्लेखनीय होती, औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील जितेंद्र ठेंग (फादर जाकीयर मेमोरियल इंग्लिश स्कूल महालगाव क्रीडा शिक्षक) यांनी सहभाग घेऊन( 84 किलो) वजन गटात तृतीय क्रमांक मिळवला स्पर्धेचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार तथा ग्रॅपलिंग कमिटी ऑफ धुळे अध्यक्ष मा.बाबासाहेब कुणाल पाटील यांचे उपस्थित करण्यात आले,याचबरोबर ओंकार बहुउद्देशीय संस्थेचे प्रा.रविंद्र निकम इन्स्टिट्यूट चे चेअरमन तथा ग्रॅपलिंग कमिटी ऑफ धुळेचे कार्याध्यक्ष प्रा.रविंद्र निकम,धुळे जिल्हा कुस्ती संघटनेचे सचिव श्री.सुनील चौधरी सर,श्री.पै.सागरभाऊ कांबळे,राष्ट्रवादी-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले,ग्रॅपलिंग कमिटी ऑफ धुळेचे सचिव प्रा.डॉ.भालचंद्र मोरे,ग्रॅपलिंग कमिटी ऑफ धुळेचे सहसचिव प्रा.विजय पाटील,श्री.राजेश बारे सर डॉ.महेंद्रकुमार वाडे इतर अनेक प्राध्यापक व संघव्यवस्थापक उपस्थित होते
लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतांना धुळे जिल्हा ग्रामीणचे आमदार बाबासो.कुणाल पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत राज्याचे नावलौकिक करावे असे मत व्यक्त केले,सदर क्रीडा प्रकार हा शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून समावेश करण्यात आलेला आहे,या क्रीडा प्रकाराचा प्रचार व प्रसारासाठी राज्यभर ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा.राकेश खैरनार व ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र महासचिव प्रा.प्रशांत नवगिरे सर सतत प्रयत्न करत आहेत,ही राज्यस्तरीय ग्रॅपलिंग क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पंचांची गरज भासते,त्यामुळे दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य पंच प्रशिक्षण धुळे जिल्हा क्रीडा संकुलात येथे आयोजित करण्यात आली होती, त्यासाठीही मोठ्या संख्येने उपस्थित लाभली,सदर राज्यस्तरीय ग्रॅपलिंग क्रीडा स्पर्धा ही जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या या स्पर्धेत धुळे जिल्हा विजेता उस्मानाबाद जिल्हा उपविजेता तर नाशिक जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला या संघांना माननीय आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या सौजन्याने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच संघ व्यवस्थापक मार्गदर्शक पंच यांना ओंकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रविन्द्र निकम यांच्यातर्फे सन्मान योजना देऊन गौरविण्यात आले

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!