ब्राम्हणगाव येथील रोजगार हमी योजनेमध्ये मंजूर झालेल्या विहिरी व रस्त्याचे काम रोजगार न लावता जेसीबी यंत्राच्या साह्याने
किनगाव/प्रतिनिधी:दि.30(योगेश भोजने)
पैठण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रोजगार हमी योजनेमध्ये मंजूर झालेल्या विहिरी व रस्त्याचे काम रोजगार न लावता जेसीबी यंत्राच्या साह्याने काम पूर्ण करत आहे व जॉब कार्ड घेऊन डुप्लिकेट मास्टर भरून पेमेंट उचलत आहे व शासनाची फसवणूक करत आहे अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती व चौकशी करुन कारवाई करण्यात यावी व त्यांचा पगार आदा करू नये अशी तक्रार दि16 जुन 2021 गोरबंजारा ब्रिगेडचे जिल्हा सचिव संतोष राठोड यांनी दिली होती त्याअनुषंगाने शासन निर्णयानुसार कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा अधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांना दिले व उपजिल्हा कार्यकारी समन्वयक रोहीयो तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना सात दिवसाच्या आत कारवाई करुन अनुपालन अहवाल सादर करायचे व विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश दिले होते. पण एक महिना उलटून गेला तरीही यावर कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई करण्यात आलेली नाही . व तक्रार देऊनही 24 जून 30 जून व 8 जुलै 2021रोजी पेमेंट आदा करण्यात आले .