आपल्या यशामध्ये गुरूचा फार मोठा वाटा असतो – राजेश दिवटे

बीड/अंकुश गवळी, दि.14
गुरुपौर्णिमेनिमित्त इंद्रायणी सेवा फाउंडेशन व स्वर्गीय माजी सैनिक गोविंदराव सखाराम पानसरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राजेश दिवटे लिखित ” झिरो ते हिरो एक प्रवास ” हे प्रेरणादायी पुस्तक भेट देण्यात आले. आपल्या यशामध्ये गुरूचा फार मोठा वाटा असतो. आपल्याला आयुष्याच्या वाटेवर अनेक गुरु भेटत असतात आपण प्रत्येकाकडून काहींना काही शिकले पाहिजे असे मत यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणादायी वक्ते लेखक राजेश दिवटे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मनोज राका, आराधना हॉटेल चे संचालक श्री. प्रकाशशेठ पानसरे, डॉ.जोशना आवारी, डॉ विकास पाटील ,डॉ. उत्तम माटे सर, डॉ.सुनील वाघमारे, कोमलताई काळभोर,प्रतिमाताई काळे,मकरंद शहापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, दिनेश कुऱ्हाडे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर,उमेश बघे, जनार्दन पितळे, दादासाहेब कारंडे यांनी केले.