जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र,राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही.
जालना/प्रतिनिधी:दि.24
शासकीय कार्यालय व न्यायालय यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुदांक शुल्क ची आवश्यकता नाही विद्यार्थींना शालेय,कामकाजासाठी वेगवेगळी प्रमाणपत्रे काढावी लागतात जसे की, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, नॉनक्रीमीनीयल प्रमाणपत्र ( प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबाबत ) व इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरणे सेतु मार्फत अर्ज दाखल करावे लागतात त्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसुल व वन विभागकडील अधिसुचना क्र. मुद्रांक 2004/1636/प्र.क्र.436/म-1 दि.1 जुलै 2004 नुसार कुठल्याही शासकीय कार्यालयात शासकीय कामकाजाकरीता व विद्यार्थांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रकरीता व न्यायालयासमोर सादर करावयाच्या इतर प्रतिज्ञापत्रावर आकरणी योग्य असणारे 100 रुपये किंमतीचे मुद्रांक शुल्क शासनाने या पुर्वीच पुर्णत: माफ केले आहे. तश्या प्रकारची प्रसिध्दी राजपत्रात सुध्दा करण्यात आली आहे. याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी, औरंगाबाद, जालना, बीड यांनी संबंधीत मुद्रांक विक्रेते आणि सर्व शासकीय कार्यालय यांना अवगत करण्यात आलेले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात सर्व प्रतिज्ञापत्रा करीता मुद्रांक शुल्क ची मागणी करु नये असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, औरंगाबादचे सोहम वायळ यांनी केले आहे.