Uncategorised

आई वडीलांनी जगण्याची अपेक्षा सोडलेल्या बाळाला मृत्यूच्या दाडेतून काढले बाहेर संजीवनी हॉस्पीटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या खडतर प्रयत्नाला यश.


जालना/प्रतिनिधी:दि.23

अवघ्या साडेआठशे ग्रॅम वजनासह जन्मलेल्या  कमकुवत बालकाच्या जगण्याची अपेक्षा आई वडीलांनी सोडली असतांनाच  येथील संजीवनी हॉस्पीटल मधील तीन तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तब्बल पावणे दोन महिने अथक परिश्रम व योग्य उपचार करुन सदर बालकाला अक्षरशः मृत्यूच्या दाडेतून सहीसलामत बाहेर काढल्यामुळे बायस कुटूंबातील सदस्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला.
त्याचे झाले असे की, प्रसुतीसाठी किमान 38 आठवडे गरोदर असणे वैद्यकीय दृष्ट्या अपेक्षीत असते. मात्र जाफ्राबाद तालुक्यातील गारखेडा येथील एक विवाहिता केवळ 28 आठवड्याची गरोदर असतांना जालना येथील अंबड चौफुली जवळ असलेल्या संजीवनी हॉस्पीटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली होती. जन्माला आलेल्या बाळाचे वजन किमान अडीच किलो अपेक्षीत असते मात्र सदर महिलेने जन्म दिलेल्या बाळाचे वजन केवळ 850 ग्रॅम इतकेच भरले होते. त्यामुळे सदर बाळाच्या फुफ्फुसाची वाढ पुरेशी झाली नसल्या कारणाने तसेच श्‍वासनाला होत असलेला त्रास, निळसर पडलेले शरीर, कमजोर असलेला मेंदु त्यामुळे सदर बाळाला झटके येवून जंतुसंसर्ग झाला होता. यासर्व परिस्थितीवर मात करण्याचे मोठे आवाहन डॉक्टरांसमोर उभे राहिले होते. संजीवनी हॉस्पीटलचे बाल रोगतज्ञ डॉ. कैलास राजगुरु, डॉ. शिवदास मिरकड, डॉ. शाम बागल यांनी हे आव्हान स्विकारुन जन्माला आलेल्या बाळावर योग्य ते उपचार करायला सुरुवात केली.  जन्मताच कमकुवत असलेल्या बाळावर उपचार करण्याचे कठीन काम हाती घेवून या तीन्ही डॉक्टरांनी सदर बाळास व्हेंटीलेटरवर ठेवून फुफ्फुसात जमा झालेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सरफॅक्टंट नावाचे औषध श्‍वास नलीकेतून दिले. तब्बल पावणे दोन महिने डॉक्टरांनी अथक परिश्रम घेत योग्य तो औषधोपचार केल्यामुळे कालांतराने मृत्यूच्या दाडेत असलेल्या बाळाच्या प्रकुतीत सुधारणा होत गेली. यशस्वी उपचारामुळे सदर बाळाच्या मेंदुची वाढ होवून फुफ्फुसामध्ये चांगली सुधारणा झाली. सदर बाळावर संजीवनी हॉस्पीटलमधील नवजात अतीदक्षता  कक्षात उपचार करण्यात आले. बाळाच्या आई वडीलांनी व नातेवाईकांनी जन्मताच कमकुवत बाळाच्या वाचण्याची अपेक्षा सोडली असतांनाच उपरोक्त डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत योग्य उपचार केल्यामुळे बाळाचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे बाळाच्या आई वडीलांसह  नातेवाईकांनी संजीवनी हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. बळीराम बागल, बाल रोगतज्ञ डॉ. कैलास राजगुरु, डॉ. शिवदास मिरकड, डॉ. शाम बागल यांचे बाळासह रुग्णांलयात येवून त्यांचे विशेष आभार मानले.

_______________________________________________
गारखेडा ता. जाफ्राबाद येथील वरद बजरंग बायस या बालकाची जन्मताच परिस्थिती अत्यंत नाजुक होती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर निश्‍चित होते. या आव्हानाला सामोरे जात सदर बालकावर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पुर्णपणे मोफत योग्य तो उपचार करुन बालकाच्या प्रकृतीत सुधारणा करण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले. कमी दिवसाच्या व कमी वजनाच्या बाळाच्या उपचारासाठी पालकांनी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बळीराम बागल यांनी केले आहे.     

_______________________________________________ 

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!