pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0 1 7 3 8 7

जालना/प्रतिनिधी,दि.31

जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात महसूल विभागातील एकुण 58 अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे अधिकारी व  कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिरात हिपॅटायटीस बी व सी तपासणी प्रसंगी जिल्हा हिपॅटायसिस नियंत्रण कार्यक्रम प्रमुख डॉ. प्रशांत बादल,  औषध निर्माण  अधिकारी मनिष जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप लुखे, डॉ.नंदकुमार जाधव व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या शिबीरात एकूण 85 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून निदान झालेल्या रुग्णांना गरजेनूसार पुढील उपचार जालना जिल्हा रुग्णालयामार्फत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे