pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विचारांची दिशा नेहमीच सकारात्मक ठेवा – अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार

0 1 7 3 8 0
जालना/प्रतिनिधी,दि.23
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना शहरात आयोजित 14 वर्षा आतील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलतांना श्रीमती मेत्रेवार यांनी सांगितले की खेळाडूंनी नेहमीच आपल्या विचारांची दिशा सकारात्मक ठेवावी, सकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात प्रगती होत असते व आपण आपल्या इच्छित धेय्या पर्यंत पोहचू शकतो, यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक, पंच, आयोजक यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रस्तावीक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अरविंद विद्यागर यांनी केले व सदर शासकीय शालेय स्पर्धेचे महत्व विषद केले . मंचावर   विशेष उपस्थितीत डॉ. चंद्रजित जाधव, (सहसचिव भारतीय खोखो महासंघ), प्रा. जे. पी. शेळके (शिव छत्रपती पुरस्कार विजेते तथा खो खो असोसिएशन चे माजी सचिव), ऍड. गोविंद शर्मा (सरचिटणीस खोखो असोसिएशन महाराष्ट्र),
श्रीमती सुहासिनी देशमुख (जिल्हा क्रीडा अधिकारी बीड), प्राचार्या. डॉ भागवत कटारे ( उपाध्यक्ष जिल्हा खोखो असोसिएशन ), डॉ. रफिक शेख (सचिव जिल्हा खो खो असोसिएशन ), दीपक सपकाळ ( तांत्रिक समिती प्रमुख ), निवड समिती सदस्य प्रशांत पवार,  श्रीमती मनीषा मानकर, विकास सुर्यवंशी, क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी दीपक जगदाळे, शेख चाँद पी.जे. (जिल्हा क्रीडा संघटक तथा सचिव जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन), प्रमोद खरात (क्रीडा प्रबोधिनी प्रमुख), कु. प्रियंका येळे (शिव छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू), प्रकाश कुंडलकर (मुख्याध्यापक जी. प. प्रशाला मुलांची जालना), प्रा.डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, क्रीडा संघटक विजय गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगीं उपस्थित खेळाडूंनी उत्कृष्ट पथ संचलन करत मान्यवरांना मान वंदना दिली. यावेळी प्रबोधिनी च्या राष्ट्रीय खेळाडूंच्या वतीने मशाल मैदानावर फिरविण्यात येऊन उद्घाटक अपर जिल्हाधिकारी  श्रीमती रिता मेत्रेवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटविण्यात येऊन स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा कार्यालयाचे संतोष वाबळे, शेख मोहम्मद, डॉ. रेखा परदेसी, सोपान शिंदे, संतोष प्रसाद , हारुण खान , राहुल गायके , सचिन मोहीते , सचिन दोरखे अमोल शिंदे मधुकर अंभोरे , क्रीडा प्रबोधिनीचे सर्व शिक्षक व खेळाडू तसेच नियुक्त केलेल्या विवीध समित्यांचे पदाधिकारी श्री देवा चित्राल , कैलास नाटकर , क्रीडा संघटक परिश्रम घेत आहेत , स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रभाकर काळे , उदय पंडया , अनिल नलावडे , सुजित माळी , अमोल मुटकळे , विजय जाहेर , योगेश सोळसे , नितीन येळवे , श्रीपाद लोहकरे , संभाजी यशवंते , विष्णू मोरे , प्रल्हाद काळे , तुकाराम करांडे आदी काम पहात आहेत .
14 वर्षाखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा
मुलींच्या गटात
1) लातूर विरुद्ध अमरावती च्या सामन्यात लातूर संघ एक डाव आठ गुणांनी विजयी.
2) छ. संभाजीनगर विरुद्ध नासिक च्या सामन्यात  नाशिक संघाने एक गुण तीन मिनिटे राखून विजयी.
3) पुणे विरुद्ध मुंबई च्या सामन्यात मुंबई तीन गुणांनी विजयी.
4) नागपूर विरुद्ध कोल्हापूर च्या सामन्यात  एक गुण व साडेतीन मिनिटं राखून विजयी.
सेमी फायनल
1) नासिक विरुद्ध लातूर च्या सामन्यात लातूर एक डाव तीन गुणांनी विजयी.
2) मुंबई विरुद्ध कोल्हापूर च्या सामन्यात कोल्हापूर एक गुण व पाच मिनिटे राखून विजयी.
मुलींमध्ये उद्या चा फायनल सामना
लातूर विरुद्ध कोल्हापूर अंतिम सामना होणार आहे.
मुलांच्या गटात* झालेले सामने
1) कोल्हापूर विरुद्ध पुणे च्या सामन्यात पुणे पाच गुणांनी विजयी.
2) अमरावती विरुद्ध मुंबई च्या  सामन्यात मुंबई एक डाव दोन गुणांनी विजयी.
3) लातूर विरुद्ध नागपूर च्या सामन्यात लातूर एक डाव दहा गुणांनी विजयी.
4) नासिक विरुद्ध छ. संभाजीनगर
च्या सामन्यात नासिक एक गुण तीन मिनिटे राखून विजय.
सेमी फायनल
1) पुणे विरुद्ध मुंबई च्या सामन्यात पुणे दोन गुण वीस मिनिटे राखून विजयी.
2) लातूर विरुद्ध नासिक च्या सामन्यात लातूर एक डाव 12 गुणांनी विजयी.
उद्याचा मुलांचा फायनल सामना
पुणे विभाग विरुद्ध लातूर विभाग मध्ये सामना होणार आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे