Uncategorised

जावई आणि मुलगी सापडेना सासरे यांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; देवगाव रं पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

कन्नड/प्रतिनिधी:दि.28 ( कृष्णा घोडके)


कन्नड तालुक्यातील देवगाव रं पोलिस ठाणे हद्दीतील माटेगाव येथील भारत रमेश मोरे यांनी जावई व मुलगी हरवल्याची देवगाव रं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीत माझी मुलगी
सोनालीला कन्नड येथील अंकुश अशोक गायकवाड रा .रिठी मोहडा ता. कन्नड यांना दिलेली आहे. तसेच माझी मुलगी सोनाली हि बाळंतपणासाठी माटेगाव येथे आलेली होती. दि.23/02/2022 रोजी दुपारी 12.00 वाजता जावई अंकुश अशोक गायकवाड भेटण्यासाठी माटेगाव येथे घरी आला.
मी कामाला बाहेर गेलो होतो .माझी पत्नी घरी होती .मी संध्याकाळी 7 वाजता घरी आलो , त्यावेळी माझ्या पत्नी ने सांगितले जावई दुपारी भेटण्यासाठी आले होते . व मला काही न सांगता , जावई व मुलगी मोटारसायकलवर दुपारी 1.30 वाजता निघुन गेले.असे सांगितले वरुन मी व पाहुण्यांनी अतापर्यंत जावई व मुलीचा शोध घेतला मिळुन आले नाही.करिता पोलिस ठाण्यात
मुलगी व जावई हे दिनांक 23/02/2022 रोजी दुपारी 1.30 वाजता कुणाला काहीएक न सांगता निघुन त्यांचा आतापर्यंत शोध घेतला मिळुन आले नाही . तर त्यांचा शोध होवुन परत मिळणेस विनंती करण्यात आली. देवगाव रं पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक टि.आर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खांडखूळे व नसो उपनिरीक्षक ऐ.टी.काळे यांनी जलद तपासायची सूत्रे हलवत काही तासात हरवलेले मुलगी व जावई यांना पिशोर येथील गायरानात राहणा-या मावशीच्या घरून ताब्यात घेतले. व देवगावरं पोलिस ठाण्यात दोघांचे जबाब घेवून तक्रारदार मुलीचे आई वडील व मुलाचे आई वडील यांच्या कडे सोपवण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक टि आर भालेराव,उपनिरीक्षक खांडखूळे सर, सपो.उपनिरीक्षक ऐ टी काळे सर श्रीमती जाधव मॅडम,पोलिस जारवाल सर उपस्थित होते.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!