Uncategorised

महिला बचत गटांच्या सौ वनिता रवी शिंदे यांची सी. आर. पी. पदावर निवड सार्थक ठरवली.

◆ महिला बचत गटाच्या सामूहिक प्रयत्नातून गावाच्या स्थितीत बदल…..

नांदेड/प्रतिनिधी:दि.26 (दिगंबर शिंदे)

दि.15-02-2019 रोजी आम्हच्या गावात वर्धिनी टिम यांचा सहवास आम्हाला लाभला.माझी इच्छाशक्ती व बौद्धिक चाचणी घेऊन उपस्थित महीला वर्गातून सी आर पी पदावर दि 27-02-2019 रोजी माझी सर्वानुमते निवड करण्यात आली,दिलेले कार्य प्रामाणिक प्रयत्नातून पुर्तता होणे ही माझी नेहमीची तळमळ असते, महीला साक्षर असो वा निरक्षर तिच्यातील इच्छाशक्तीमुळे ती आज परीपुर्ण स्त्री म्हणून ओळखली जाते. कारण एक महीला सुशिक्षित झाली तर एक परीवार सुशिक्षित होतो व परीवार सुशिक्षित झाला तर गाव सुशिक्षित होतो असे म्हणतात. महीला सक्षमीकरणाची दोर बांधून समुह व माझा गाव,आज विकासाच्या वाटेवर आहे, असे मत जाहीर मी व्यक्त करते. मी गेल्या दोनवर्षापासून माझ्या धानोरा या गावात सी आर पी म्हणून कार्यरत आहे, माझ्या दैनंदिन करीत असलेल्या अभियान कार्यातून माझ्या धानोरा या गावाचा महीला स्वयंसहायता समुह माध्यमातून कायापालट झाला आहे. याआधी आम्हच्या गावात महीला चूल व मुल पुरत्याच मर्यादित होत्या ‘बचत गट म्हणजे काय यांची कल्पना नव्हती, महीलांना घर शेती या पलिकडे जाऊन कुठलिही सामाजिक माहिती नव्हती मी माझ्या गावात आज रोजी 38 समुह तयार केले असून ते अभियान अंतर्गत दसशुत्री नियमावली प्रमाणे कार्यरत आहेत. तसेच 24-02-2020 रोजी वरीष्ठ वर्धिनी मार्फत एकता ग्रामसंघ स्थापन करण्यात आले त्या नंतर सी आर पी पद कार्यरत असताना मी नेहमी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष हदगाव सर यांच्या रूपाने सखोल माहिती मार्गदर्शक लाभल्याने सरांच्या प्रामाणिक कर्तव्यातून आम्हाला नेहमी नवउमेद प्राप्त होते व प्रेरणा मिळते, आजही एकता ग्रामसंघ धानोरा अंतर्गत जोडलेल्या समुहातील महीलां बॅक व्यवहार, शालेय पालक मेळाव्यात सहभागी होतात,कृषि विषयक उपक्रम राबविने, शालेय पोषण आहार असे, विविध उपक्रम राबविण्याकरीता आम्ही महीलांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे.1 मे 2020 रोजी कृषि विषयक मृदा परीक्षण करणे,नळपट्टी भरणे,आरोग्य शिबिरे, कोरोना लसीकरण मोहीमेत महीलांचा मोठा सहभाग व सहकार्य लाभले, 22-03-2019 गाव हगणदारी मुक्त होणे याकरिता गुड मॉर्निंग पथक मध्ये देखिल महीलांनी उपस्थित दर्शवून जनजागृती केली,14-07-2019 ग्रामपंचायत सभेत महीलांनी सहभाग दर्शवून शासकीय योजनेची माहिती मिळवली,जाॅब कार्ड मिळवून देऊन,25-04-2020 नरेगा अंतर्गत गरजूंना रोजगार निर्मितीसाठी आम्ही महीलांनी विशेष पुढाकार घेऊन कार्य केले.21-02-2020 स्वच्छता भारत मिशन अंतर्गत महीला परीसर स्वच्छता अभियानात देखील सहभागी झाल्या.23-09-2020 शैक्षणिकदृष्ट्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांना संत गाडगेबाबा महीला समुहा अंतर्गत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.14-07-2019 रोजी पंचायत समिती कडून सामाजिक आंकेशनची कामे हाती घेऊन परगावी गावी सोशल आॅडीट च्या अंतर्गत सिंचन विहीरी व ग्रामविकास आराखडा बाबतीत पाठपुरावा केला त्यातही भरपूर यश मिळवले.23-05-2021 वेळी कोरोना काळात बाहेरून आलेल्या लोकांना जि प शाळेवर अन्नधान्य पुरवून समुहा अंतर्गत उपाय योजना केल्या, प्रत्येक समुहातील महीलांना बॅक कर्ज परतफेड नियमित कशासाठी असते या बाबतीत माहिती दिली, आय डी बी आय बॅक निवघा येथे सुमारे 80 महीलांचे वैयक्तिक खाते करून विमा योजना सहभाग घेण्यासाठी सहकार्य केले. रमाई समुह धानोरा 2010 मधील कर्जथकीत समुह या समुहास आम्ही 20-07-2021 एकता महीला ग्रामसंघ बैठक दरम्यान ठराव जाहीर करून नोटीस बजावली व आज रोजी महीलांनी 90,000/-इतकी कर्ज रक्कम परतफेड करून समुहातील महिलांच्या अर्थिक व्यवहारात पारदर्शक प्रतिमा निर्माण केली आहे.,05-07-2021दरम्यान गरीबी निर्मूलन आराखडा व ,मिशन अंत्योदय अंतर्गत 113 परीवाराचा समावेश करून सविस्तर नावे विषय सहीत सर्वे नोंद केले.एकता ग्रामसंघ मध्ये नावे जाहीर करून ग्रामपंचायत मध्ये ठराव मांडण्यात आला व महिलांच्या उपस्थितीत सह सादर केले आज रोजी प्रत्येक गरीब व्यक्तीला स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध होत असून समाधान व्यक्त होत आहे.समुहातील महीलांना मासिक ग्रामसंघ बैठक दरम्यान येणाऱ्या समस्या, अर्थिक गरजा जाणून घेऊन,ग्रामसंघ बैठकीत नोंद करून आवश्यक वाटल्यास ग्रामपंचायत मध्ये मांडणी करून समस्येवर निवारण करण्यासाठी प्रयत्न केले समुह बॅक कर्जरककमेच्या माध्यमातून स्वत चे नविन्यपुर्ण व्यवसाय सुरू केले ,06-02-2021साप्ती येथे कलेक्टर साहेब सी ओ मॅडम यांना देखील महीलांनी बनविलेले खाद्यपदार्थ व कलात्मक वस्तू ची प्रात्यक्षिक सादर केले, पंचायत समिती मध्ये स्टाॅल उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली 25-09-2021 दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण स्वरोजगार योजना अंतर्गत माझ्या गावातील गरीब घरातील सुशिक्षित दोन तरूणीची नावे देऊन या तरूणीना ट्रेनिंग करीता पाठवले. आम्ही आरोग्य उपक्रमात स्वत उपस्थिती दर्शवून सहकार्य करीत आहोत. 17-10-2021 रोजीउज्वला योजना अंतर्गत एकूण 26 कुटूंब लाभार्थ्यांना गॅस शेगडी उपलब्ध करून दिले. आम्हच्या बॅक व्यवहार पडताळणी करता आज जिल्हा व तालुका बॅक ठिकाणी आज रोजी समुहातील बॅक व्यवहार बाबतीत दृष्टीकोन पारदर्शक व सकारात्मक झाला आहे आज माझ्या गावातील महीला तालुका ठिकाणी न जाता आम्ही गावातील समुहातील महिलांकडून आवश्यक सामान, वस्तू, माल खरेदी, विक्री करून सहकार्य करीत गावातच रोजगार उपलब्ध करून देत आहोत. आज रोजी माझ्या गावात महीलांना कुठलिही अडचण नाही, गावातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग आम्हाला आवर्जून कुठल्याही *उपक्रमासाठी आमंत्रित करतात, पुर्वी पेक्षा आज रोजी समुह म्हणजे बचत करणे पुरते मर्यादित न राहता महीलांचे हक्क व अधिकार करीता जनजागृती झाली, कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ प्राथमिक स्तरावर ग्रामसंघ नंतर ग्रामपंचायत मार्फत तात्काळ सोडविल्या जाते याचे आत्मिक समाधान आज रोजी आम्हा धानोरा रूई येथील समुहातील महीलांना आहे..ही वास्तविक सत्य आहे.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!