अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जाफराबाद तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.5
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जाफराबाद तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय आढावा बैठक टेंभुर्णी येथे संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी समता परिषदेचे प्रदेश सचिव तथा निरीक्षक ,भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री रवीभाऊ सोनवणे, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाषभाऊ राऊत ,समता परिषदेचे प्रदेश प्रचारक तथा प्रवक्ते डॉ. नागेशजी गवळी , जिल्हाध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे ,दीपकभाऊ बोराडे, युवक जिल्हाध्यक्ष विशाल धानुरे, जिल्हा उपाध्यक्ष घेर सरपंच, सुंदरराव कुदळे ,तालुकाध्यक्ष रवींद्र उखर्डे, कार्याध्यक्ष नंदकिशोर जाधव, प्रसिद्धीप्रमुख राजू घोडके, टेंभुर्णी शहराध्यक्ष पुंजाराम धनवई, सोसायटीचे चेअरमन गणेश धनवई, व्हॉइस चेअरमन अंकुशराव देशमुख, राम गुरव ,विक्रम ऊखर्डे ,दत्ता सोनसाळे ,विष्णू जोशी ,अमोल देशमुख ,दीपक देशमुख, हेकाडे मामा, रामदास धनवई,सुनील भाले आढावे मामा, माने मामा आदींची उपस्थिती होती .या बैठकीचे अध्यक्षस्थान रवीभाऊ सोनवणे यांनी भूषविले .सुभाषभाऊ राऊत व नागेशजी गवळी यांनी मार्गदर्शन केले. समता परिषदेच्या वतीने गणेश धनवई व अंकुशराव देशमुख यांची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष रवींद्र ऊखर्डे यांनी केले तर आभार राम गुरव यांनी व्यक्त केले.