Uncategorised
संततधार पावसामुळे खरीप पीक धोक्यात!

नादेड/दिगांबर शिदे,दि.5
परिसरातील निवघा , धानोरा , आडा , रूई , येळम , करोडी , शिवपुरी , हस्तरा , बोरगाव , मागील एक महीन्यापासून संततधार पाऊस, तर कधी अतिवृष्टमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर पिके धोक्यात आली आहेत, पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यानी शेतीकामाला सुरुवात केली होती शेतकरी डवरणी निदणी , औषधि फवारणी करीत होते, परंतु 4 जुलै गुरुवार रोजी तब्ब एक तास जोरदार पाऊस निवघा बा, व धानोरा रूई परिसरात बरसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे,