श्री गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहिमेची जनजागृती

◆देवगाव रं पोलिस स्टेशनचे सपोनि अमोल मोरे उपनिरीक्षक खांडखूळे व कर्मचारी यांचा घर घर तिरंगा जनजागृतीत रॅलीत सहभाग
कन्नड/कृष्णा घोडके,दि.5
येत्या 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवणारा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने श्री गणेश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार 5 ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारातून तिरंगा, घरोघरी तिरंगा मोहीमेस सुरवात करण्यात आली. नागरिकांना ध्वज संहितेचे पालन करून ध्वज फडकावण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी देवगाव रंगारी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे सर उपनिरीक्षक खांडखूळे सर, सपो.उपनिरीक्षक काळे सर,तसेच पोलिस कर्मचारी, अॅडव्होकेट संदीप शिरशे,रॅलीत सहभागी झाले होते.
जनजागृतीसाठी देवगाव रंगारी गावातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत उपमुख्याध्यापक श्री मोगरे सर, विद्यालयाचे अध्यापक अध्यापिका व विद्यार्थी तसेच श्री गणेश शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री नानाजी कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य श्री गोकुळ गोरे ,इतर कर्मचारी व गावातील नागरिक
बहुसंख्येने उपस्थित होते.