सावंगी (त) केंद्रात शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
सिंधीकाळेगाव/श्याम गिराम,दि.5
जालना तालुक्यातील उमरी येथे
जि प प्रा शा उमरी केंद्र सावंगी (त ) येथे 2022- 2023 या सत्रातील पहिल्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती उमरीचे अध्यक्ष विजय पवार प्रमुख पाहुणे साधन व्यक्ती जालना डॉ करुणा हिवाळे ,श्रीमती शीतल मिसाळ व मार्गदर्शक सावंगी (त) केंद्राचे केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड तसेच उपाध्यक्ष मांदळे, कृष्णा गाडेकर व सर्व सावंगी (त) चे सर्व मुख्याध्यापक राठोड , रुद्रे, काळे, भुरे, होनवडजकर, कोरधने, डासाळकर ,पऱ्हाड, ईरमले, बोलसुरे व सहशिक्षक श्रीखंडे , तळेकर ,खिलारे ,अशोक,राजू , साठेवाड, श्रीमती नाडे,पाटील उपस्थित होते.यावेळी डॉ करुणा हिवाळे यांनी शाळापूर्व तयारी पाहिले पाऊल ,विध्याप्रवेश ,निपुण भारत अंतर्गत पार्शवभूमी,गरज ,महत्त्व, यामधील शिक्षकाची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
FLN मूल्यमापन, NSA ,PGI indicater ,व आनंददायी अभ्यासक्रम अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड यांनीं केले.विद्यांजली पोर्टल व शाळा रजिस्ट्रेशन विषयी सविस्तर मार्गदर्शन सतिश श्रीखंडे यांनी केले तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आणि अध्ययन स्तर,शाळा स्तर नियोजन व प्रपत्र याविषयी माहिती श्रीमती शीतल मिसाळ यांनी केले.
अध्ययन अध्यापनात साहित्याचा परिणामकारक वापर ,मराठी गणित साहीत्य पेटी, कृतीपुस्तिका याविषयी काळे माहिती दिली. निपुण भारत अभियान प्रतिज्ञा , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,समारोप व आभार प्रदर्शन जि प प्रा शा उमरी चे मुख्याध्यापक प्रशांत भुरे यांनी केले.