जिजाऊ प्रायमरी स्कूल, शेलगाव या उपक्रमशील शाळेस स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान…!

जालना/भगवान धनगे, दि.5
भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 साठी जिल्ह्यातील 1990 पैकी 38 शाळांची निवड झाली. अद्ययावत इमारत, उत्कृष्ट भौतिक सुविधा, आधुनिक व पाणी सुविधेसह स्वच्छतागृह, हॅण्डवॉश स्टेशन इत्यादींवर स्पर्धा पार पडली. शाळेने सर्व निकष उत्कृष्ट पणे पुर्ण केल्यामुळेच स्वच्छ विद्यालय पुरस्काराकरीता जिजाऊ प्रायमरी स्कूल, शेलगाव या उपक्रमशील शाळेची निवड झाल्याबद्दल मा. विजय राठोड (जिल्हाधिकारी, जालना) व मा. मनूज जिंदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना) यांचे हस्ते स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्विकारताना मेस्कोचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके, शाळेच्या प्राचार्य सौ. कविता गजानन वाळके, केंद्रप्रमुख ठाकुर साहेब, संस्था प्रतिनिधी नारायण गोल्डे, उपप्राचार्य बी.ए. निकम व एन.बी. कमळे, प्र. अधिकारी यु.बी. बबीरवाल, प्राचार्य वैद्य व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिजाऊ प्रायमरी स्कूल, शेलगाव या उपक्रमशील शाळेची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.