Uncategorised

जिल्हा परिषद विभाग, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2022 आरक्षण व मतदार यादी कार्यक्रमास स्थगिती

जालना/भगवान धनगे,दि.5

दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये जागांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार होती. त्याचप्रमाणे दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये बुथनिहाय अंतिम मतदार यादी जारी करण्यात येणार होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता केलेल्या मतदार याद्यांच्या आणि आरक्षणाच्या प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत,अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!