Uncategorised

संपाच्या अफवेमुळे परतुरात पेट्रोलपंपावर तोबा गर्दी

परतूर/लक्ष्मीकांत राऊत,दि.30

परतूर – उद्यापासून पुढील तीन दिवस पेट्रोल पंप चालकांचा संप असल्याची अफवा पसरल्याने शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यात आग्रवाल पेट्रोल पंपावर वाहनांच्या चालकात पेट्रोल भरण्यासाठी रेटारेटी झाल्याने काही काळ चांगलाच गोंधळ उडाला.
उद्यापासून पुढील तीन दिवस पेट्रोल पंप संपामुळे बंद राहतील अशा प्रकारच्या अफवा कोणीतरी जाणीवपूर्वक पसरविल्याने सायंकाळ पासून परतूर शहरातील आग्रवाल पेट्रोल पंप, आकात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांच्या तोबा गर्दी मुळे पेट्रोल पंप कर्मचारी भांबावून गेल्याचे दृष्य पहायला मिळाले.मात्र आकात पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक बाळासाहेब चव्हाण, आग्रवाल पेट्रोल पंपाचे मॅनेजर विष्णू तरासे यांनी मात्र याबाबत माहिती देताना पंप चालकांचा एक दिवस संप उद्या असल्याचे सांगितले. पण कोणीतरी तीन दिवस पेट्रोल पंप बंद असतील अशी अफवा पसरल्याने ही गर्दी झाली आहे. लग्न सराई सुरू असल्याने दुचाकी सोबत चार चाकी वाहनांची ही मोठी संख्या पंपावर पहायला मिळाली.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!