pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण पूर्व विभागात भाजपला मोठे खिंडार

कोप्रोली येथील कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांसह २०० कार्यकर्त्यांचे शिवसेना (ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

0 1 7 2 4 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 23

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उरण तालुक्यात कोप्रोली येथे जाहीर कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आगरी, कोळी व आदिवासी समाजाच्या दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने उरण पूर्व विभागात भाजपला जोरदार खिंडार पडले आहे. यामध्ये ऍड पर्जन्य म्हात्रे, नंदन म्हात्रे , महेश कोळी, माजी उपसरपंच सारिका म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या शानी कातकरी यांनी शेकडो कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश केला.या सर्वांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवबंधन बांधून व भगवी शाल अर्पण करून शिवसेनेत स्वागत केले. या प्रवेशाने कोप्रोलीत शिवसेनेची ताकद वाढली आहे.

या मेळाव्याला प्रमुख पाहुणे असलेल्या जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी एन डाकी, माजी सभापती विश्वास म्हात्रे, तालुका उपसंघटक रुपेश पाटील, महिला सेनेच्या उपजिल्हासंघटिका ममता पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्थानिक भाजप आमदार महेश बालदी यांच्या फसव्या विकासाची लक्तरे काढत केंद्र सरकार तसेच गद्दार मिंध्ये सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. त्यांनी स्फूर्ती दिली, हजारो शिवसैनिक अयोध्येत गेले आणि बाबरी पाडली. आज तिथं मंदिर बनते आहे. मात्र ज्यांनी बाबरी पाडल्याचे नाकारत पळ काढला ते आज हिंदुत्वाचा डांगोरा पिटत आहेत. हिंदूच्या धार्मिक अस्मितेचे राजकारण करणाऱ्या भाजपला बाळासाहेबांचा, शिवसेनेचा विसर पडला. मंदिर निर्माणाच्या कार्यात शिवसेनेचा त्याग सर्वश्रुत आहे. भाजपच्या स्थानिक आमदार महेश बालदीच्या फसव्या विकास योजनांना आता फसू नये. केंद्र आणि राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले. जनता त्रस्त आहे. त्यामुळे इथल्या मातीचा जातीचा हक्काचा आमदार निवडून आणण्याचे काम कार्यकर्त्याचे आहे. येत्या निवडणूकीत आपण लक्षणीय मतांनी विजयी होणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे अशी सूचना केली. भाजपमधून आलेल्यांचे स्वागत करताना त्यानी आपल्याला निश्चित सन्मान मिळेल असा विश्वास दिला. याप्रसंगी चिरनेर, कलंबूसरे, पुनाडे, वशेनी, सारडे, कोप्रोली ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्ष प्रवेशकर्ते ऍड पर्जन्य म्हात्रे यांनी सांगितले की भाजपाचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या कार्यपद्धतीला आम्ही सर्व कार्यकर्ते कंटाळलो, तिथं सन्मान नव्हता, कामे होत नव्हती. त्यामुळे जिथं सन्मान नाही तिथं काम करणे शक्य नसल्याचे सांगत आपण मनोहरशेठ भोईर यांची कार्यपद्धती अनुभवली आहे सर्वसामान्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याच्या त्यांच्या पद्धतीवर प्रभावित होऊन आम्ही प्रवेश करत आहोत. येत्या निवडणुकीत मनोहरशेठ भोईर यांना मोठे मताधिक्य मिळवून देत विजयी करणार असल्याचे पर्जन्य म्हात्रे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास माजी सभापती स्वाती म्हात्रे, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे, माजी तालुकाप्रमुख राजीव म्हात्रे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख मधुसूदन पाटील, विभागप्रमुख भूषण ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत पाटील, मनोज पाटील, आवरे सरपंच निराबाई म्हात्रे, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर व मान्यवर उपस्थित होत्या. या जाहीर मेळाव्यासाठी शाखाप्रमुख आकाश म्हात्रे, उपशाखाप्रमुख निखिल म्हात्रे, माजी उपसरपंचज नीरज पाटील, विपुल म्हात्रे, उपसरपंच योगेश पाटील यांच्यासह नंदनाथ म्हात्रे, अशोक पाटील, रवी म्हात्रे, विश्वनाथ पाटील, उल्हास पाटील, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण म्हात्रे, प.र.पाटील, किशोर म्हात्रे, अनिल पाटील प्रवीण पाटील, आणेश म्हात्रे, गिरीश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, बाळू पाटील, अजित म्हात्रे, विनय म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, मनोहर कातकरी यांनी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे