Uncategorised

शिवसेना नागरी समस्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक

◆ जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकरांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर मुख्याधिकारी निरुत्तर

जालना/भगवान धनगे, दि.12
जालना शहरातील खालील नागरी समस्या सोडविणे अत्यंत महत्वाचे आहे. पाणी : सध्या जालना शहरातील पाणी पुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असूनही अनेक वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. अत्यंत गरीब व मोल-मजुरी करणारे लोक राहत असलेल्या वडारवस्ती भागातील पाईपलाईन तीन वर्षे झाली पण जोडली नाही. तसेच अनेक वस्त्यात आठ दिवसांत एकदा मिळणारे पाणीही बंद झालेले आहे. यामुळे शिवसेनेने रुद्र अवतार धारक करीत या नागरी समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख भास्कर अंाबेकर यांनी मुख्याधिकारी यांच्यावर िवविध प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रश्नापुढे मुख्याधिकारी निरुत्तर झाले.
रस्ते : जालना शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झालेली आहे. शहरातील कन्हैय्या नगर समोरील रस्ता अत्यंत खराब झालेला असून मोठ-मोठे खडडे पडलेले आहेत. नगर परिषदेच्या हद्दीत येणारा हा रस्ता नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभाकडून तात्काळ दुरुस्त करुन घ्यावा. शहरातील बालाजी गल्ली, आरपी रोड यासारखे इतरही रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडचण व नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हया रस्त्यांची कामे पुर्ण करावीत.
नाले सफाई : मे महिना अर्धा संपलेला असून जून महिन्यात पावसाला सुरुवात होते त्यामुळे जालना शहरातील मोठे नाले तात्काळ गाळ काढून साफ करणे गरजेचे आहे. ज्यामुळे वाहून जाणारे सांडपाणी साचणार नाही व दुर्गधी पसरणार नाही. तसेच पावसाळ्यापुर्वीच साफ-सफाई झाली नाही तर नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी नागरी वस्त्यांत घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे मान्सुनपुर्व मोठया नाल्यांची साफ- सफाई, गाळ काढण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे.
वेस बंद : मागील दोन वर्षांपासून जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पाणीवेस या महत्वाच्या मार्गावरील मुविस दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या वेशीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अनेक संघटना तसेच नागरीकांनी आंदोलने रास्ता रोको केले परंतु तरीही हा मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे. काही दिवसांपुर्वी तर चक्क माजी मंत्री मा.श्री.अर्जुनरावजी खोतकर यांनीही रास्ता रोको करुन यावर पालीकेचे
लक्ष वेधले त्यावर एक महिन्यात हा रस्ता हा रस्ता करण्याचे अश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु अद्यापही हा रस्ता सुरु करण्यात आलेला नाही. तरी या बाबत तात्काळ कार्यवही करावी.
मोकाट कुत्री : जालना शहरात मोकाट जनावरांप्रमाणेच मोकाट कुत्र्यांचा त्रासही अधिक आहे. ही मोकाट कुत्री रात्रीच्या वेळी वाहनांचा तसेच नागरीकांच्या पाठीशी लागून चावा घेतात. शहरात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. अनेक वर्षापासून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे मोठया प्रमाणावर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. करीता नगर परिषदेने कॅम्प लावून या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिम हाती घ्यावी, जेणे करुन ही संख्या आटोक्यातयेण्यास मदत होईल.
बंद स्विमींग पुल : जालना शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा विचार करुन जालना शहरात मोती बागेजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाची उभारणी करण्यात आली. परंतु हा तलाव मागील अनेक वर्षापासून नागरीकासाठी बंद करण्यात आलेला आहे. तरी तो लवरात लवकर नागरीकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी नागरीकांमधून सातत्याने होत आहे. तसेच सध्या शाळेला सुटया असल्याने बच्चे कंपनींसाठी असलेली छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मीनी ट्रेन, संगीत कारंजे बंद झालेले आहेत. त्यांची दुरुस्ती करुन लवकरात लवकर ते सुरु करण्यात आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले,नगर सेवक विजय पवार, नगरसेवक रावसाहेब राऊत, माजी शहर प्रमुख बाला परदेशी, नगरसेवक अशोक पवार, प्रकाश घोडे, राम खांडेभराड, आदींसह इतरांची नावे अाहेत.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!