Uncategorised

शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये कौशल्‍़य चाचण्याव्दारे प्रवेश 

 जालना/भगवान धनगे,दि.10

 महाराष्ट्र राज्यात राट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्‍़त प्रशिक्षण शिक्षण भोजन, निवास अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्‍़य चाचण्याव्दारे निवासी  व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून सामध्ये 1. अमरावती- अर्चरी, ज्युदो, 2. नागपुर- हॅण्‍़डबॉल, मैदानी3. अकोला- बॉक्सींग, 4. गडचिरोली- मैदानी 5. ठाणे- बॅडमिंटन 6. नाशिक- शुटींग, मैदानी7. कोल्हापुर- शुटींग, कुस्ती 8. औरंगाबाद- मैदानी, हॉकी 9. पुणे- टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक्‍़स या क्रीडा प्रबोधिनीनिहाय या खेळाचा समावेश  असून याची अर्हता खालीलप्रमाणे आहे.

        सरळ प्रवेश प्रकीया :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्‍़यस्‍़तरावर पदक प्राप्‍़त केलेले खेळाडू  किंवा राष्‍़ट्रीय स्‍़तरावर राज्याचे प्रतिनिधीत्‍़व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचधी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.

       खेळ निहाय कौशल्‍़य चाचणी :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्‍़यस्‍़तरावर सहभागी खेळाडूना ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे अशा खेळाडूंना संबं‍धित

खेळनिहाय कौशल्‍़य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.

       अनिवासी प्रवेश प्रक्रीया :- अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता अधिकृत राज्‍़य, राष्‍़ट्रीय, स्‍़पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय स्थान प्राप्‍़त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल.

       या करीता या कार्यालयामार्फत जिल्हास्‍़तरावर प्रसिध्दी व अर्ज संकलन करण्याकरीता जिल्हयातील खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्ज, जन्‍़म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्‍़यक कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्रे/ आधारकार्ड/ जन्‍़मदाखला इत्यादी) माहिती सह अर्ज दि. 10  ते  13 मे 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत व अधिक माहितीकरीता श्री. महेश खर्डेकर, कबड्डी क्रीडा मार्गदर्शक- 9423393619, श्री. एम.झेड. शेख, फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक,- 8788360313, श्री. संतोष वाबळे, खो-खो क्रीडा मार्गदर्शक- 7588169493,यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!